पोस्ट्स

बायको पाहिजे नोकरीवाली

  v  बायको पाहिजे नोकरीवाली... कोडगेगावापासून भकासवाडीकडे फुटणा-या रस्त्यावर दगडू टरफलेचं घर. गावापासून दिडेक किलोमीटरवर. थोडसं उंचावर. पत्र्याच्या दोन खोल्या , घरासमोर एक मोठी शिळा , त्या शिळेवर घरातले पुरूषमंडळी अंघोळ करायचे. बाजूला गोठा. एक गावरान गाई , दोन खिलारी बैलं , दोन शेळ्या , दहा-बारा कोंबड्यांचं खुराडं. घरासमोर एक लिंबाचं झाड , इतके वर्ष होवूनही ते काय वाढत नव्हतं. बहुतेक घरातल्याच माणसांचा गुण त्यानेही घेतलेला होता. सकाळचे नऊ वाजले असतील. घरासमोर शेणानं सारवलेल्या परवरावर दगडू काडीनं दात टोकरत बसला होता. दगडूला दोन पोरं , गौतम व दत्तू दोघेही नोकरीला , गौतम नुकताच प्राथमिक शिक्षक म्हणून लागलेला होता , तर लहाना दत्तू मिलेट्रीत भरती झाला होता. त्यामुळं घरात दोघेच असत. दगडू आपला विचार करत बसलेला होता की , आज बायकू काय पेरायला लावतीय. पाऊस पडून गेला होता. चांगली ओल झालेली होती. रानेही वापश्यावर आलेली होती. दगडूची बायको हौसाबाईच जरा त्यांच्यात हुशार होती. पण जरा कजाग होती. ती न्याहरीसाठी भाकरी थापत बसलेली होती. तिला अचानक आठवतं की बांधावरच्या काट्या...